हा ही चांगला… तो ही चांगला… राहुल नार्वेकर यांच्या निकालाची नेमकी काय होतेय चर्चा?
१ वर्ष ८ महिने खटला चालून शेवटी अपात्र कोणीच ठरले नाही. हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर संजय राऊत यांच्याबरोबर विरोधक आणि अंजली दमानिया यांनी देखील आक्षेप घेतलाय.
मुंबई, १२ जानेवारी २०२४ : शिवसेनेच्या निकालावरून सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये नाना पाटेकर यांचा डायलॉग शेअर करत कमेंट केली. १ वर्ष ८ महिने खटला चालून शेवटी अपात्र कोणीच ठरले नाही. हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर संजय राऊत यांच्याबरोबर विरोधक आणि अंजली दमानिया यांनी देखील आक्षेप घेतलाय. महाराष्ट्राचा महानिकाल असला तरी त्यांचं वाचन इंग्रजीत का झालं. नार्वेकर यांच्या सूचनेनं ड्राफ्ट तयार झाला तर मग नार्वेकर तो निकाल वाचताना अडखळत का होते? असा सवाल दमानिया यांनी केला. तर निकाल वाचन सुरू असताना नार्वेकरांना खोकला आला तर अनेकदा ते अडखळे…यावर काय म्हणाले स्वतः राहुल नार्वेकर?
Published on: Jan 12, 2024 11:54 AM
Latest Videos