महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, नाराज धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?

महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, नाराज धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?

| Updated on: Mar 19, 2024 | 11:18 AM

भाजपकडून रणजितनाईक निंबाळकरांना यंदाही उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. तिकीट न मिळाल्याने मोहिते-पाटील खासदार निंबाळकर यांनी विरोधकांची मोट बांधल्याचे पाहायला मिळत आहे

मुंबई, १९ मार्च २०२४ : माढा मतदारसंघातच महायुतीमध्येच राजकीय राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून रणजितनाईक निंबाळकरांना यंदाही उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. तिकीट न मिळाल्याने मोहिते-पाटील खासदार निंबाळकर यांनी विरोधकांची मोट बांधलीये तर दुसरीकडे धैर्यशील माने यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चांनीही जोर धरलाय. महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना असं चित्र आहे. ज्या मोहितेंच्या जोरावर मागच्या वेळी रणजितसिंह निंबाळकर माढ्यातून विजयी झालेत. त्यांनाच डावलून पुन्हा रणजितसिंह यांना तिकीट मिळाल्याने माळशिरसचे मोहिते नाराज आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यंदा भाजपकडून इच्छुक मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार? अशा चर्चा रंगताय.

Published on: Mar 19, 2024 11:18 AM