Disha Salian प्रकरणाला 5 वर्षांनंतर नवी ‘दिशा’, राणे पिता-पुत्रांनी आदित्य ठाकरेंना घेरलं; सभागृहात नेमकं काय घडलं?
पाच वर्षानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे. दिशाच्या आई वडिलांनी याबद्दल कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ज्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला.
औरंगजेबनंतर सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन प्रकरण पुन्हा छेडल्याने सभागृहात जोरदार राडा झाला. विशेष म्हणजे आधी ठाकरेंच्या शिवसनेत असताना मनिषा कायंदे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून भाजपवर शरसंधान साधलं होतं. त्यांनी दिशा सालियन प्रकरणावर भाष्य केल्याने ठाकरे गटाचे अनिल परब चांगले आक्रमक झालेत. पाच वर्षात आतापर्यंत विविध यंत्रणांकडून चौकशी झाल्या त्यातून काय निष्पन्न झालं हे सभागृहात सांगा याची मागणी होत असताना मंत्री दादा भुसे यांनी मात्र परबांच्या सरडा शब्दान महिलेचा अपमान केल्याचा दावा केला. दिशा सालियन ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. जून 2020 मध्ये चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. मात्र काही भाजप नेत्यांसह राणे पितापुत्रांनी दिशावर बलात्कारानंतर हत्या झाल्याचा आरोप केला. यावरून आदित्य ठाकरेंवर सुद्धा आरोप झाले. पहिला तपास 8 जून 2020 ला मुंबई पोलिसांनी सुरू केला. तपासात मृत्यूचे कारण आत्महत्या सांगितलं गेलं. 2021 मध्ये हत्या व गुन्हेगारीचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगत तपास बंद झाला. मात्र पोलिसांवर तत्कालीन मविआ सरकारचा दबाव असल्याचा दावा करत राणे पितापुत्रांसह भाजप नेते आरोप करत राहिले. 2022च्या फेब्रुवारी महिन्यानंतर दिशाची हत्या कशी झाली हे 7 मार्च नंतर उघडेल म्हणून चंद्रकांत पाटील यांनी दिलेला इशाराही फोल ठरला.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
