Tanaji Sawant : मंत्रिपद हुकलं, सर्व गेलं… तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्…
तानाजी सावंत यांचं मंत्रिपद हुकल्याने ते नाराज आहे. अशातच तानाजी सावंत यांनी आपली बॅग पॅक करून निघाले आहेत. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तानाजी सावंत सहभागी होणार की नाही? हे देखील पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे मंत्री तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. तानाजी सावंत यांचं मंत्रिपद हुकल्याने ते नाराज आहे. अशातच तानाजी सावंत यांनी आपली बॅग पॅक करून निघाले आहेत. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तानाजी सावंत सहभागी होणार की नाही? हे देखील पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यंदा पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात आल्याने महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळेल अशी आशा होती पण त्यांचं मंत्रिपद हुकल्याचे पाहायला मिळाले. काल नागपुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचेही पाहायला मिळाले होते. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, भरत गोगावले, बालाजी किणीकर यांच्या नावाचा समावेश आहे. तर दुसरीकडे दीपक केसरकर, तानाजी सावंत यांचीही मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिपक केसरकर, तानाजी सावंत या दोन्ही माजी मंत्र्यांची भेट नाकारल्याने त्या दोघांना निराश होऊन परतावे लागले. अशातच काल समोर आलेल्या शपथविधी कार्यक्रमानंतर तानाजी सावंत यांना कोणतंही मंत्रिपद देण्यात आलं असल्याचे पाहायला मिळाले.