मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकवाड यांच्याकडून नाराजी; म्हणाल्या, आमचं म्हणणं आम्ही मांडलं...

मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकवाड यांच्याकडून नाराजी; म्हणाल्या, आमचं म्हणणं आम्ही मांडलं…

| Updated on: Apr 11, 2024 | 2:22 PM

महाविकास आघाडीमध्ये असलेल्या धुसफुसीचा परिणाम काँग्रेसवर झाला आहे. अशातच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील जागावाटपावरून असलेली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकवाड यांच्याकडून नाराजी

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मुंबईतील जागा वाटपावरुन काँग्रेसमधील नाराजी अद्याप दूर झालेली नाही. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या धुसफुसीचा परिणाम काँग्रेसवर झाला आहे. अशातच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील जागावाटपावरून असलेली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. ‘मुंबईत जागा वाटपावर आम्ही नाराज आहोत. यामुळे पक्षश्रेष्ठींकडे आमचे म्हणणे आम्ही मांडले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आमचे संघटन आहे. यामुळे मुंबईत पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावे, ही अपेक्षा होती. मुंबईतील कोणत्या जागा हव्या होत्या, ते पक्षातील श्रेष्ठींना सांगितले होते. जो उमेदवार जिंकणार आहे, त्याला तिकीट द्यावे, ही अपेक्षा होती.तर पक्षाने आपणास विश्वासात घेतले नाही’, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले. मविआसोबत जागा वाटपावर चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घ्यायला हवी होती. या जागा वाटपाच्या वेळी मलाही विश्वासात घेतले गेले नाही. परंतु मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. आघाडी असताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही तडजोडी कराव्या लागतात. असेही त्या म्हणाल्या.

Published on: Apr 11, 2024 02:22 PM