शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी अन् EVM विरोधात रोष

शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी अन् EVM विरोधात रोष

| Updated on: Nov 26, 2024 | 4:21 PM

शरद पवारांकडून केवळ निवडणुकीच्या निकालावरून आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने 233 जागा मिळवून घवघवीत यश मिळवलं तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. यंदा राज्यात पुन्हा एकदा भाजपची लाट आली असून एकट्या भाजपाच्या वाट्याला 132 जागा पडल्या. मात्र या निकालावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी त्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीतदेखील ईव्हीएम आणि एकूणच समोर आलेल्या मतांच्या आकडेवारीवरून त्याविरोधात रोष व्यक्त करण्यात आला आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवरून रोष व्यक्त करत विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक असल्याचीही भूमिका मांडली असल्याची माहिती मिळत आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील निवडणुकीचा निकाल आणि ईव्हीएम मशीनवरून रोष व्यक्त केला आहे. ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Published on: Nov 26, 2024 04:21 PM