भाजपवरून शिंदे गटातील अंतर्गत नाराजी उघड, अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले?

भाजपवरून शिंदे गटातील अंतर्गत नाराजी उघड, अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले?

| Updated on: Mar 29, 2024 | 11:21 AM

शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचल्याने नाराजी आहे. निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वतःकडे घेचल्याची शिंदे गटातून तक्रारी असल्याची माहिती सूत्रांची आहे. काही मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिंदे गटात नाराजी...

लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी आता समोर आली आहे. सर्व्हेचं कारण देत भाजप शिंदे गटाच्या जागा स्वतः ओढत असल्याचा तक्रारी आता शिंदे गटाकडून सुरू झाल्या आहेत. शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचल्याने नाराजी आहे. निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वतःकडे घेचल्याची शिंदे गटातून तक्रारी असल्याची माहिती सूत्रांची आहे. काही मतदारसंघ भाजपकडे गेल्याने शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे. यासोबतच नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याची शिंदे गटात चर्चा आहे. ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आलो, आता अशी वागणूक नको, नेत्यांकडून खंत व्यक्त केली जात आहे. लोकसभेच्या जागावाटपात अशी स्थिती मग विधानसभेला काय होणार? अशी शंकाही आमदार आणि खासदारांनी व्यक्त केली आहे. नेमकी काय आहे शिंदे गटात अंतर्गत नाराजी, बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 29, 2024 11:21 AM