शिवरायांच्या शिल्पातील कपाळावर वार? शिल्पकाराची पोस्ट अन् कमेंट वादात, नेमका वाद काय?
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला शिल्पकार जयदिप आपटे आपल्याच एका फेसबूक पोस्टवरच्या कमेंटनं वादात आलाय. अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनी त्यावर आक्षेप घेत इतिहासासोबत अजून किती छेडछाड करणार म्हणून प्रश्न विचारल्यानं मिटकरी आणि राणेंमध्ये जुंपलीय. पण नेमका हा वाद काय आहे? बघा व्हिडीओ
पुतळ्यानंतर शिल्पकार जयदिप आपटे त्याच्या एका फेसबूक पोस्टनंही वादात आलाय. एका शिल्पात आपटेनं शिवरायांच्या कपाळावर झालेल्या वाराची खूण दाखवलीय, आणि त्याखालच्या कमेंट्समध्ये आपटेनं जे उत्तर दिलंय, यावरुन मिटकरींनी सवाल उभा केलाय. दरम्यान, ५ डिसेंबर २०२३ ला शिल्पकार जयदिप आपटेनं त्याच्या फेसबूकवर एक पोस्ट केली. यात शिवरायांचं एक शिल्प आहे. त्यांच्या डाव्या डोळ्याच्या कपाळावर एक खूणही दिसतेय. ही खूण अफजलखान वधावेळी शिवरायांवर झालेल्या तलवारीच्या वाराची आहे. इतिहासकारांच्या मते, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं शिवाजी महाराजांवर तलवारीनं वार केला होता. तोच वार कपाळावर झाल्यानं ती खूण राहिली. ही पार्श्वभूमी झाली. आता हा वाद सुरु झाला जयदिप आपटेनं पोस्ट केलेल्या या फोटोच्या एका कमेंटवरुन आनंद सहस्रबुद्दे नावाच्या व्यक्तीनं त्यावर कमेंट केली की, “सुरेख… मस्त डिटेलिंग केलंय… महाराजांच्या डोक्यावर घावाची खूण पण शिल्पात दिसत आहे…मस्त…”. त्यावर शिल्पकार आपटेनं उत्तर दिलं की, “तू पहिलाच आहेस ज्यांनी हे ओळखलं. बाकीच्यांना समजावून सांगावं लागतं.” पुन्हा आनंद सहस्रबुद्धेनं त्यावर रिप्लाय देताना लिहिलं की, “कलाकृती वाचून आत्मसात करावी लागते. तुझ्यासारख्या मित्रांमुळे हे शिकता येतं.” त्याला उत्तर देताना शिल्पकार आपटे काय म्हणाला बघा?