Chandrakant Patil | धमक्यांना घाबरत नाही, चंद्रकांत पाटील यांचा हसन मुश्रीफांवर पलटवार
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची एसीबीकडे तक्रार करण्याचं म्हटलं आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. मुश्रीफांच्या धमक्यांना घाबरत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची एसीबीकडे तक्रार करण्याचं म्हटलं आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. मुश्रीफांच्या धमक्यांना घाबरत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. रस्ते घोटाळे प्रकरणात ही तक्रार असेल, असं मुश्रीफांनी म्हटलं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. त्याआधीही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचा घोटाळा समोर आणला. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ते माझे मित्र आहेत. माझं नाव हे त्यांच्यासाठी झोपेची गोळी आहे. मित्राला माझं नाव घेतल्यावर चांगली झोप लागत असेल तर हरकत नाही. ते 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. त्या ऐवजी त्यांनी 500 कोटींचा दावा दाखल करावा. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते, त्यासाठी व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवालही पाटील यांनी केला होता.