महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन प्रेशरमध्ये काम करतंय हे दुर्दैवी - नवनीत राणा

महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन प्रेशरमध्ये काम करतंय हे दुर्दैवी – नवनीत राणा

| Updated on: Feb 12, 2022 | 8:33 PM

नवनीत राणा शाईफेक प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांकडून केवळ चार लोकांनीच रुग्णालयात प्रवेश करण्यास सांगितलं. यावरुन नवनीत राणा चांगल्याच संतापल्या. तेव्हा पोलीस अधिकारी आणि नवनीत राणा यांच्यात बाचाबाची झाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या कारणावरुन महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी अटकेतील आरोपींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. या प्रकरणातील काही आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आरोपींना भेटण्यासाठी नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची महिला पोलीस अधिकाऱ्याशी चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या.

नवनीत राणा शाईफेक प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांकडून केवळ चार लोकांनीच रुग्णालयात प्रवेश करण्यास सांगितलं. यावरुन नवनीत राणा चांगल्याच संतापल्या. तेव्हा पोलीस अधिकारी आणि नवनीत राणा यांच्यात बाचाबाची झाली. पाटील मॅडम तुम्ही आवाज कमी करा. त्या रुग्णाच्या दोन्ही किडनी फेल आहेत, तुम्हाला माहिती नाही. आम्हाला माहिती आहे त्या रुग्णाची परिस्थिती काय आहे ती. आवाज कमी करा, थोडच बोला पण आवाज कमी करा. तुम्हाला माहिती नाही माझा आवाज किती आहे, पूर्ण रुग्णालय हलवून टाकेन मी. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याकडूनही तुम्हाला मी घाबरत नाही, असं उत्तर देण्यात आलं. तेव्हा तुम्हालाही मी घाबरत नाही, जनतेचं काम करत आहे, असं नवनीन राणा म्हणाल्याचं, या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.