Special Report | उड्डाणपुलावरून श्रेयवाद, सेना-राष्ट्रवादीचा ठाण्यात राडा!

| Updated on: Jan 15, 2022 | 8:33 PM

कळव्यातील खारीगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद उफाळून आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे बॅनर दिसून आले, त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले, काही वेळातच नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले.

ठाणे : आज ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) दोन पक्षातील कार्यकर्ते पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचे दिसून आले. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू होण्याआधी राष्ट्रवादी (Ncp) आणि शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे राज्यात जरी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर आली आहे, या सगळ्या वादाला सुरूवात बॅनरबाजीवरून झाली. कळव्यातील खारीगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद उफाळून आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे बॅनर दिसून आले, त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले, काही वेळातच नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.