पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून अजित दादांचा चंद्रकांत दादांना झटका? पाहा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, राज्य सरकारने १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली, पुणे जिल्ह्यात ना अजित पवार, ना चंद्रकांत पाटील, मग कोण? पहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ | पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. विशेषतः पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून अजित दादांचा चंद्रकांत दादांना झटका दिल्याचे पाहायला मिळत आहे. तर १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या यादीतही दुसऱ्यांदा बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावापुढे पुणे ऐवजी रायगड असा उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांचा गट महिना उलटून गेल्यानंतर पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटेना. त्यातच १५ ऑगस्टला जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यावरूनही रस्सीखेच सुरू झाली आहे. अखेर तिढा काही केल्या सुटला नाही त्यामुळे नवी यादी करण्याची वेळ सरकारवर आली आहे. विशेष म्हणजे पुण्याच्या पालकमंत्रिपदावरूनही वाद सुरूये. सरकारने केलेल्या पहिल्या यादीत चंद्रकांत पाटील यांच्या नावापुढे पुणे जिल्हाचे नाव होते. मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी अजित पवारही आग्रही आहेत. त्यामुळे तुर्तास कोणताही मार्ग न निघाल्याने नव्या यादीत चंद्रकांत पाटील यांच्या नावापुढे रायगड असा जिल्हा नमूद केल्याचे पाहायला मिळत आहे.