गिरीश महाजनांसमोर रक्षा खडसे अन् पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडीओ व्हायरल; काय बिनसलं?

गिरीश महाजनांसमोर रक्षा खडसे अन् पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडीओ व्हायरल; काय बिनसलं?

| Updated on: Mar 26, 2024 | 5:28 PM

रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीतील वादाचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय.

जळगावात भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीतील वादाचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय. एकनाथ खडसे यांचे नाव घेतात मात्र मंत्री गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाही असा सवाल पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंना केला. रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत असल्याने पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, नाराज पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसेंना खडेबोल सुनावले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह तसेच रक्षा खडसे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे उघड झाले आहे. या बैठकीला आमदार, पदाधिकारी तसेच जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती असल्याचे व्हिडिओतून बघायला मिळत आहे.

Published on: Mar 26, 2024 05:28 PM