रुपाली चाकणकर अन् रोहिणी खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी?
रूपाली चाकणकर यांचा मुक्ताईनगरचा दौरा रोहिणी खडसे यांच्या टीकेवरून चांगलाच चर्चेत आहे. लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या १५०० रूपयांच्या वादावरून सुरू झालेला वाद एकमेकांचे राजकीय बाप काढण्यापर्यंत पोहोचला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
मुक्ताईनगरच्या दौऱ्यात रूपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं. सून एका पक्षात लेक दुसऱ्या पक्षात असं रूपाली चाकणकर यांनी म्हणत रोहिणी खडसे या वडिलांच्या कर्तृत्वावर उभ्या असल्याची टीका केली. त्यावर रूपाली चाकणकर यांचं राजकारणातील अस्तित्व काय? याचं उत्तर त्यांच्या फेसबुकवर आलेल्या कमेंट्समधून मिळतात, असं प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी दिलं आहे. यानंतर पक्ष बदलण्यावरूनही दोघींमध्ये वार-प्रतिवार झालेत. आम्ही सुरूवातीपासून घड्याळ या चिन्हासोबत आहोत, आम्ही कधीच पक्ष बदलला नाही, असा दावा रूपाली चाकणकर यांनी केला. दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही, असं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांनी रूपाली चाकणकर यांना खोचक टोला लगावला आहे. तर रूपाली चाकणकर यांनी आधी स्वतःचं बघावं, असही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. ‘दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही, पहिले आपलं पाहावं. आपणही पहिलेयांच्याकडे होत्या आता अजित शरद पवार दादा पवार यांच्याकडे आहात’, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.