16 MLAs Disqualified | 16 आमदारांवरून राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

16 MLAs Disqualified | 16 आमदारांवरून राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

| Updated on: May 16, 2023 | 7:17 AM

VIDEO | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 16 आमदारांचा निर्णय कसा करणार? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या (16 MLAs Disqualified) अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलाय. न्यायालयाने निकाल दिला तेव्हा नार्वेकर हे लंडनमध्ये होते. आता मुंबईत दाखल झाल्यानंतर लवकर निर्णय घ्या, असे ठाकरे गटाने म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाच्या दोन बाबी मांडल्या आहेत. शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी घाईपण करणार नाही, आणि विलंबही करणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाची विधानंही केलीत. एक म्हणजे मूळ राजकीय पक्ष कोणता हे आधी ठरवणार आणि दूसरं म्हणजे व्हीप कोणाचा लागू होणार, अर्थात प्रतोद कोण असणार याचा निर्णय आधी घेऊन निर्णय प्रक्रिया सुरू करणार असं त्यांनी सांगितले. जे राहुल नार्वेकर म्हणाले, तोच कळीचा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल देतानाही यावर स्पष्ट भाष्य केले आहे. काय म्हटलं होतं सुप्रीम कोर्टानं निकालात बघा…स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 16, 2023 07:15 AM