डॉक्टर्स आणि नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काय दिली माहिती?

डॉक्टर्स आणि नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काय दिली माहिती?

| Updated on: Mar 28, 2024 | 3:23 PM

मुंबईत पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकांच्या कामासाठी केईएम, नायर सारख्या बड्या मुंबई महानगर पालिका रुग्णालयातील डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात येणार असल्याचे सांगितले जात होत. मात्र त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. डॉक्टर्स आणि नर्सेस यांना देण्यात आलेले निवडणूक कामाबाबतचे आदेश तात्काळ रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकांच्या कामासाठी केईएम, नायर सारख्या बड्या मुंबई महानगर पालिका रुग्णालयातील डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात येणार असल्याचे सांगितले जात होत. मात्र त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता डॉक्टर्स, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. राजकीय पक्ष, कार्यकर्ते तर कंबर कसून जंगी तयारी करत आहेतच, पण त्यासोबत शिक्षक, महापालिकेचे कर्मचारी यांनाही या कामाला लावण्यात येते. यंदा यांच्यासोबच निवडणूकीच्या कामांसाठी डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटी लावण्याचा निर्णय जाहीर झाला होता. मात्र त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता होती. म्हणूनच यासंदर्भात एक नवा निर्णय घेण्यात आला असून डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे.

Published on: Mar 28, 2024 03:23 PM