Sangali | कार्यालयांच्या कामाच्या वेळेची विभागणी करा, कार्यालयात गर्दी होऊन देऊ नका : मुख्यमंत्री

Sangali | कार्यालयांच्या कामाच्या वेळेची विभागणी करा, कार्यालयात गर्दी होऊन देऊ नका : मुख्यमंत्री

| Updated on: Aug 02, 2021 | 3:40 PM

पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कार्यालयांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची कळकळीची विनंती केली.

पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकल सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मुंबई लोकलबाबत आपण लगेच निर्णय घेणार नाही. कारण कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यासाठी केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करणं शक्य नाही. काही गोष्टी शिथील करत आहोत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम पाहूनच निर्णय घेणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी कार्यालयांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची कळकळीची विनंती केली. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांनी कामाच्या वेळा विभागून घ्या. हवं तर 24 तास कार्यालये सुरू ठेवा. माझी हरकत नाही. पण कार्यालयात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्या. वर्क फ्रॉम होम करणं शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करायला सांगा. उद्योगांनी शक्य आहे तिथे बायो बबल करणे व आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.