Avinash Bhondwe | ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता देशात तिसऱ्या लाटेची शक्यता : अविनाश भोंडवे

Avinash Bhondwe | ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता देशात तिसऱ्या लाटेची शक्यता : अविनाश भोंडवे

| Updated on: Dec 26, 2021 | 1:24 PM

जानेवारीत दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट दस्तक देईल असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. 

संपूर्ण देशात ओमिक्रॉन आणि कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्याचप्रमाणे दिल्लीतली स्थिती आणखी चिंताजनक आहे. कारण दिल्लीत मागील काही महिन्यातील मोठी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. दिल्लीत मागील चोवीस तासात 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जी 13 जूननंतर सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. यामध्ये दिल्लीतल्या पॉझिटिव्ह रेटमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी घसरत आहे. लोक वेळीच सतर्क झाले नाहीत तर जानेवारीत दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट दस्तक देईल असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.