Dombivli | डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मनपाडा पोलिसांनी 22 जणांना घेतलं ताब्यात
15 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. आरोपी नराधम हे अल्पवयीन मुलींना देखील सोडत नाहीय. त्यामुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवलीत तर प्रचंड संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने तर सर्वच हद्द पार केल्यात. एका 15 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच राजकीय वजनाचा माज मनात ठेवून आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. दरम्यान, याप्रकरणी मनपाडा पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतलं आहे.
Latest Videos