कोरोनाच्या JN.1 व्हेरीएंटला घाबरु नका, पण काळजी घ्या, केंद्रिय आरोग्यमंत्री भारती पवार यांचे आवाहन
कोरोनाचा नवा JN.1 व्हेरीएंट वेगाने पसरत आहे. संपूर्ण या नव्या व्हेरीएंटच्या साडे तीन हजार केसेस आढळल्या आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केरळात व्हेरीएंटच्या 2,800 केसेस आढळल्या आहेत. महाराष्ट्रात 37 केसेस आढळल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जनतेला घाबरू नको परंतू काळजी घ्या असे आवाहन केले आहे.
नागपूर | 28 डिसेंबर 2023 : कोरोनाचा जो नवीन व्हेरीएंट JN.1 आहे, त्याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन सूचना दिल्या आहेत. सर्व राज्यांना नोटीफिकेशन, गाईडलाईन दिल्या गेल्या आहेत. केरळ सारख्या राज्यात 2800 पेशंट आढळले आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही, कारण जेएन.1 हा सब व्हेरीएंट असल्याने फार काही सिरियस नाही. परंतू हा व्हेरीएंट वेगाने पसरतो आहे. आपण कोरोनाचा सामना केला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी, सहव्याधी असलेल्यांनी तसेच इम्युनिटी कमकुवत असलेल्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्दी खोकला ताप अशी लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्यावा असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 28, 2023 05:55 PM
Latest Videos