मनसे महायुतीत येणार? रामदास आठवले स्पष्ट म्हणाले, राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेऊ नका…
मनसे महायुतीत सहभागी होणार का? मनसेचे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसतात असे विचारताच राज ठाकरे म्हणाले की, व्यासपाठीवर दिसले, तिथे पाहिलं म्हणून युत्या-आघाड्या होत नसतात.... दरम्यान, यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही विचारले असता त्यांनी थेट म्हटले....
लातूर, २७ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी म्हणून मुंबईत बैठका झाल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. तर शाखाध्यक्षांच्या बैठका आता चालू केल्यात. मुंबई-ठाण्यात बैठका झाल्या. आता पुन्हा बैठका होतील. चाचपणी सुरु आहे. असे गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याण, डोंबिवलीच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी सांगितले होते. अशातच राज ठाकरे महायुतीत येणार का? अशा चर्चा चांगल्याच जोर धरू लागल्या आहेत. मात्र या चर्चांदरम्यान, राज ठाकरे यांनाच यावर प्रश्न विचारला असता त्यांनी थेट भाष्य केले. मनसे महायुतीत सहभागी होणार का? मनसेचे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसतात असे विचारताच राज ठाकरे म्हणाले की, व्यासपाठीवर दिसले, तिथे पाहिलं म्हणून युत्या-आघाड्या होत नसतात…. दरम्यान, यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही विचारले असता त्यांनी थेट म्हटले की राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नका….राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेतल्याने महायुतीला काही फायदा होईल असं दिसत नाही. मी असताना तसं राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही, राज ठाकरे लोकप्रिय नेते आहेत त्यांचा स्वतंत्र लढण्यातच फायदा आहे , असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते लातूर इथं माध्यमांशी बोलत होते.