आम्हाला धर्म, हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, आमचा धर्म, सेवाधर्म – आदित्य ठाकरे
मी संपलेल्या विषयावर बोलत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. जेव्हा संघर्ष सुरू होता, तेव्हा आम्ही अयोध्येला जात होतो. आता संघर्ष संपलाय.
नांदेड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या अयोध्या (ayodhya) दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला असतानाच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनीही राज यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या दौऱ्याला विरोध होत आहे, यावर काय सांगाल? असा सवाल आदित्य ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर, मी संपलेल्या विषयावर बोलत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. जेव्हा संघर्ष सुरू होता, तेव्हा आम्ही अयोध्येला जात होतो. आता संघर्ष संपलाय. आता आशीर्वाद घ्यायला जाणार असल्याचे अदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
Published on: May 10, 2022 04:06 PM
Latest Videos