Dr. Hamid Dabholkar | इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर डॉ. हमीद दाभोळकर म्हणतात…

| Updated on: Jan 14, 2022 | 6:37 PM

कोरोनाच्या काळात अशा पद्धतीची विधान करणे चुकीचे असून याबाबत जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत जरी गुन्हा नोंद होत नसला तरी मात्र साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार यावर कारवाई होते का हे पाहणे गरजेचे असल्याचे मत अंनिसचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केले आहे.

सातारा : इंदुरीकर महाराजांनी केलेल्या कोरोना वक्तव्याबाबत अंनिसचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंदुरीकर महाराजांनी मी माळ घातल्यामुळे मला कोरोना होत नाही असं विचित्र विधान केल आहे. वास्तविक कोरोना होऊ नये यासाठी शासन वेगवेगळ्या स्तरावर काम करत असताना लस घेणे काळाची गरज बनले असताना याविषयी गैरसमज पसरवले जात आहेत, तेही वारकरी संप्रदायाच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा कोरोनाच्या काळात अशा पद्धतीची विधान करणे चुकीचे असून याबाबत जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत जरी गुन्हा नोंद होत नसला तरी मात्र साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार यावर कारवाई होते का हे पाहणे गरजेचे असल्याचे मत अंनिसचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केले आहे.