दरवर्षी 60 हजार लोकांचा सर्पदंशाने मृत्यू, भारतात कोणते सर्प सर्वांत विषारी अन् दंश झाल्यावर काय करावं?
VIDEO | भारतात दरवर्षी 60 हजार नागरिकांचा मृत्यू हा सर्पदंशाने होत असून सर्पदंश मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू, बघा काय आहे डॉक्टरांचं म्हणणं नेमकं काय?
पुणे, २१ ऑगस्ट २०२३ | सध्या पावसाळा सुरू असल्याने ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वाढत आहेत. जगात सर्वाधिक सर्पदंश हे भारतात होत असून जगभराच्या तुलनेत 80% मृत्यू हे दरवर्षी भारतात होत आहेत. 60 हजार नागरिकांचा मृत्यू हा दरवर्षी सर्पदंशाने भारतात होत असून सर्पदंश मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जागतिक पातळीवरही सध्या प्रयत्न सुरू आहेत. भारतातही जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये डॉक्टर सदानंद राऊत आणि त्यांची पत्नी यावर गेली अनेक वर्षापासून काम करत आहेत. राऊत कुटुंबीयांनी आतापर्यंत 6 हजारांपेक्षा जास्त सर्पदंश झालेल्या नागरिकांचा जिवदान दिले असून शून्य सर्पदंश मृत्युदर मोहीम ते दिवस रात्र मेहनत घेवून राबवत आहेत तर देशभरात ही भविष्यात अशा मोहीम राबवने गरजेचे असणार आहे तेव्हाच भारतातील संर्पदंश मृत्यूचे प्रमाण घटणार आहे, असे त्यांचे मत आहे. नक्की भारतात कोणते सर्प सर्वांत विषारी आहे आणि त्याचा दंश झाल्यावर काय काळजी घेतली पाहिजे, बघा व्हिडीओ…