निवडणूक जिंकल्यावर कोणत्या पक्षासोबत हात मिळवणी करावी? वडिलांनी सत्यजित तांबेंना कोणता सल्ला दिला…
सत्यजित तांबे यांचं काँग्रेस पक्षासोबतचं बंड अन् त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळेनाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. या विजयावर सत्यजित यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. सत्यजित तांबे यांचं काँग्रेस पक्षासोबतचं बंड अन् त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे या निवडणुकीने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. 29 हजार 465 मतांनी सत्यजित तांबे यांनी विजय खेचून आणला. या विजयावर सत्यजित यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अप्रत्यक्षपणे भाजपची सत्यजित यांना साथ असल्याचं दिसत होतं. आता जिंकून आल्यावर सत्यजित भाजपची वाट धरणार का? याची चर्चा होतेय. त्याबाबत डॉ. सुधीर तांबे यांनी महत्वाचा सल्ला दिलाय. सत्यजित यांनी अपक्षच राहावं कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊ नये, असा सल्ला सुधीर तांबे यांनी दिलाय.
Published on: Feb 03, 2023 07:45 AM