Ayodhya Ram Mandir : रामलल्लाचं अयोध्येतील मंदिराचं स्वप्न साकार, अन् ३२ वर्षांनी पायात घातली चप्पल
आज शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामचंद्र त्यांच्या जागी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आज चप्पल घातली. विकास भावसार यांनी घेतलेला आपला संकल्प मागे घेतला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सन्मानपूर्वक कारसेवक विलास भावसार यांना पादत्राणे घातली.
जळगाव, २२ जानेवारी, २०२४ : जळगावातील एका कारसेवकाने अयोध्या येथील राम मंदिराचे स्वप्न झाल्यानंतर तब्बल 32 नंतर चप्पल घातली असल्याचे समोर आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत 1992 च्या कारसेवेत सक्रिय सहभाग असलेले विलास भावसार… विलास भावसार यांनी जोपर्यंत अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर होत नाही तोपर्यंत पायात पदत्राने घालणार नाही, असा संकल्प केला होता. आज शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामचंद्र त्यांच्या जागी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आज चप्पल घातली. विकास भावसार यांनी घेतलेला आपला संकल्प मागे घेतला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सन्मानपूर्वक कारसेवक विलास भावसार यांना पादत्राणे घातली. भावसार यांनी आज राम मंदिर पूर्ण होत आहे, याचा तर आनंद आहेच मात्र या कारसेवेमध्ये सक्रियपणे ज्यांचा सहभाग होता ते कारसेवक राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हाताने मला पादात्राने घातली त्याचाही खूप आनंद आहे असे ते यावेळी म्हणाले.