बाईक वाचवायला गेला पण पुरात तोच वाहून गेला; बघा धक्कादायक VIDEO
पुराच्या पाण्यात अडकलेली मोटारसायकल जिवाच्या आकांताने वाचवण्याची धडपड केली मात्र ती वाहून गेली आणि यासोबत चालकही वाहून गेला. याच धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बघा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा धक्कादायक व्हिडीओ
वाशीम जिल्ह्याला मुसळधार पावसाने चागलंच झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर कारंजा तालुक्यातील जयपूर- शाह परिसरातील नाल्याला पूर आला होता. या पुरातून मार्ग काढत असताना एक वयस्कर व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात सापडला आणि पाण्यासोबत वाहून गेला. या धक्कादायक घटनेनंतर तसाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोटार सायकल आणि चालक मोटरसायकल सोबत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली. खुलताबाद तालुक्यातील धाड नदीला आलेल्या पुरात मोटरसायकलसह मोटार सायकलचालक वाहून गेला आहे. चालकाने मोटार सायकल वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचाच जीव धोक्यात घातला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेली मोटारसायकल जिवाच्या आकांताने वाचवण्याची धडपड केली मात्र ती वाहून गेली आणि यासोबत चालकही वाहून गेला. याच धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.