Video | सांगलीत निम्म्याहून अधिक द्राक्ष बागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांना अपेक्षा राज्य सरकारच्या मदतीची

Video | सांगलीत निम्म्याहून अधिक द्राक्ष बागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांना अपेक्षा राज्य सरकारच्या मदतीची

| Updated on: Dec 06, 2021 | 12:20 AM

जिल्ह्यातील 384 गावामध्ये अतिवृष्टी बाधित झाली आहेत. जिल्ह्यात तब्बल बारा हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसलाय. यामध्ये 10 हजार 639 हेक्टर द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. डाळिंब पिकाच्या 343 हेक्टर बागेचे नुकसान झाले आहे.

सांगली : जिल्ह्यातील 384 गावामध्ये अतिवृष्टी बाधित झाली आहेत. जिल्ह्यात तब्बल बारा हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसामुळे फटका बसलाय. यामध्ये 10 हजार 639 हेक्टर द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. डाळिंब पिकाच्या 343 हेक्टर बागेचे नुकसान झाले आहे. तसेच यामध्ये मका, ज्वारी, हरभरा, आणि भाजीपाला याचा देखील समावेश आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी रात्रीपासून सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाने जिल्ह्यातील काढणीला आलेली आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बागांमध्ये पाणी साचले असून मण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहेत.

Published on: Dec 06, 2021 12:20 AM