तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे गटारं तुंबली, घरांमध्ये शिरलं गटाराचं पाणी
VIDEO | अवकाळी पावसानं नागरिकांची दैना, घरा-घरातून गटाराचं पाणी उपसण्यासाठी होतेय कसरत, बघा व्हिडीओ
पुणे : पुण्याच्या भोरमध्ये रविवारी संध्याकाळच्या सुमारास तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे भोर शहरातील गटार तुंबल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील भोईआळी परिसरात या अवकाळी पावसामुळे घरांमध्ये गटाराचं पाणी शिरलं. हे पाणी घरात शिरू नये यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. तर काही ठिकाणी घरात शिरलेलं पाणी काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करायला लागली. पुणे शहरातल्या गटारांची साफसफाई न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त करत नगरपालिकेकडून गटारं स्वच्छ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर भोर तालुक्यातील पोंबर्डी गावच्या परिसराला देखील गारांसह पडलेल्या जोरदार पावसानं झोडपून काढलं. तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं, आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. तर गारांमुळं सर्वत्र पांढरी चादर पसरली होती. मागच्या काही दिवसात बिघडलेल्या वातावरणाचा, अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना फटका बसत असल्यानं बळीराजा चिंतेत आहे.