Nagpur Scam | ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
VIDEO | ऑनलाईन गेमच्या नादात अडकून एका व्यापाऱ्याने तब्बल ५८ कोटी रुपये गमावल्याची घडली धक्कादायक घटना, आरोपीच्या घरावर धाड टाकून १७ कोटी अन् ३०० किलो चांदीसह साडे १२ किलो सोनं जप्त
नागपूर, २२ सप्टेंबर २०२३ | नागपूर शहरातील एका व्यापारास ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून व्यवसाय करुन नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरात ऑनलाईन गेममधून ५८ कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तर आरोपीकडून १७ कोटी रक्कम, साडेबारा किलो सोनं तर ३०० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे ऐवजांपैकी काही रक्कम काँग्रेस नेत्याची असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. या काँग्रेसच्या नेत्याच नाव मधुकर सव्वालाखे असे असून आरोपीच्या वकिलाने त्यांच्यावर आरोप केलाय.
गेल्या काही दिवसांपूर्वी गोंदियातील काका चौकात असलेल्या अनंत उर्फ सोंटू जैन यांच्या घरी नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालत कारवाई केली होती. याप्रकरणात अनंत जैन यांनी फिर्यादीची ऑनलाईन खेळाच्या नावावर तब्बल ५८ कोटी ४२ लाख १६ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी गोंदिया पोलिसांच्या मदतीने जैन यांच्या घरी धाड घालून जवळपास १४ कोटींची रक्कम आणि ४ किलो सोन्याचे बिस्किट घरातून ताब्यात घेतले होते.