इंद्रायणी फेसाळली, रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांचा आरोग्यावर प्रश्नचिन्ह
VIDEO | इंद्रायणी नदीत पुन्हा फेस, या प्रदूषणामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
पुणे : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान येत्या 10 जूनला होतंय. एकीकडे वारीचा हा उत्साह असताना अलंकापुरीतील इंद्रायणी नदीची मात्र प्रचंड दुरावस्था झाल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या केमिकलमुळे इंद्रायणी नदीमध्ये पुन्हा एकदा फेस तयार झाला. नदीच्या या प्रदूषणामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवला आहे. दरम्यान, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आळंदी नगर परिषदेने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याची मागणी भाविकांकडून सातत्याने होत आहे त्या पार्श्वभूमीवर अखेर नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले.