भाऊ डोकं काम करना... मनोज जरांगे पाटील यांचा डुप्लिकेट पाहिलात का?

भाऊ डोकं काम करना… मनोज जरांगे पाटील यांचा डुप्लिकेट पाहिलात का?

| Updated on: Nov 23, 2023 | 4:26 PM

राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी केली जात आहे. तर जागोजागी स्वागत करण्यात येत आहे. नेवासा शहरात आज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. मात्र सभेआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने वेध सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अहमदनगर, २३ नोव्हेंबर २०२३ : मराठा आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार कायम आहे. अशातच मराठा आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या बांधवांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. सध्या जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरा सुरू असून मनोज जरांगे यांच्या आज अहमदनगर जिल्ह्यात तीन जाहीर सभाचं आयोजन करण्यात आले आहे. नेवासा शहरात पहिली सभा 11 वाजता तर शेवगाव येथे दुपारी 3 वाजता दुसरी सभा होत आहे. राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी केली जात आहे. तर जागोजागी स्वागत करण्यात येत आहे. नेवासा शहरात आज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. मात्र सभेआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने वेध सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रामेश्वर घोंगडे असे व्यक्तीचे नाव ते धनगर समाजाचे असून पाठिंबा देण्यासाठी आजच्या सभेत दाखल झाले होते.

Published on: Nov 23, 2023 04:26 PM