अजित पवार यांना समर्थन, भेट घेतलेले कोणते होते ते ९ आमदार?

अजित पवार यांना समर्थन, भेट घेतलेले कोणते होते ते ९ आमदार?

| Updated on: Apr 19, 2023 | 6:37 AM

VIDEO | एकीकडे अजित पवार भाजमध्ये जाणार अशा चर्चा, तर दुसरीकडे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवत त्यांची भेट घेतलेली 'ते' आमदार कोणते?

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चांचं अजित पवार यांनी खंडन केलं. यादरम्यान राज्यातील काही राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या कार्यालयात ही भेट झाली. आमदार त्याच्या काही कामानिमित्त आल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे. असे असले तरी हे सर्व आमदार अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. अनिल पाटील, देवेंद्र भुयार, धनंजयमुंडे. संजय मामा शिंदे, नितीन पवार, अण्णा बनसोडे, शेखर निकम, धर्मरावबाबा आत्राम आणि अरूण लाड यांनी अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी स्वत: या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीचं काम करत राहणार आहे, माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. मला काही आमदार भेटले. पण ते आमदार मला कामानिमित्त भेटण्यासाठी आलेत. कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवल्या जातोय, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Published on: Apr 19, 2023 06:37 AM