VIDEO : Nanded Earthquake | नांदेडसह परिसरात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेडमध्ये आज वेगवेगळ्या शहरात अनेक भागात सौम्य धक्के जाणवले आहेत.
राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेडमध्ये आज वेगवेगळ्या शहरात अनेक भागात सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरात सकाळी 8:33 मिनिटांनी वेगवेगळ्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
त्याशिवाय अनेक भागात जमिनीतून गूढ आवाज देखील झाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान या भूकंपाचे केंद्रबिंदू हे यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर असल्याची माहिती भूकंपशास्त्र राष्ट्रीय केंद्राने दिली आहे. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ही बाब नमूद करण्यात आली आहे. यवतमाळमधील या भूकंपाची तीव्रता 4.4 रिस्टर स्केल इतकी होती.
Latest Videos