Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून निवडणूक आयोगाकडून 'या' सुविधा

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून निवडणूक आयोगाकडून ‘या’ सुविधा

| Updated on: Oct 15, 2024 | 4:31 PM

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.

संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. महाराष्ट्रात 9 कोटी 3 लाख मतदार आहेत. यामध्ये 4 कोटी 93 लाख पुरूष मतदार तर 4 कोटी 60 लाख महिला मतदार आहेत. अशातच मतदानाचा टक्का वाढावा, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं म्हणून विधानसभा निवडणुकीच्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांना काही सुविधा देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी सर्व बुथवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्यांना घरातून मतदानाची सुविधा देण्यात आली आहे. आणखी काय सुविधा आहेत, बघा व्हिडीओ

Published on: Oct 15, 2024 04:30 PM