“राज्यपालांचं वक्तव्य झाकण्यासाठी राऊतांवर कारवाई”, विद्या चव्हाण यांची टीका
राज्यपालांचं वक्तव्य झाकण्यासाठी राऊतांवर कारवाई करण्यात आली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केलं आहे.
राज्यपालांचं वक्तव्य झाकण्यासाठी राऊतांवर कारवाई करण्यात आली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही राऊतांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. “गेल्या अडीच वर्षांपासून कट-कारस्थान सुरू आहे. कट-कारस्थानचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे आजच का? काल राज्यपालांवर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. म्हणून त्यावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे खेचण्यासाठी संजय राऊतांवर आज ईडीची कारवाई होत आहे,” असं त्या म्हणाल्या.
Published on: Jul 31, 2022 03:44 PM
Latest Videos