Sanjay Raut यांच्यावर ED कारवाई झाली, त्यांच्यावर अन्याय, याबाबत मोदींना कल्पना दिली – Sharad Pawar
तप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? हा प्रश्न संपूर्ण देशाला पडला होता. महाष्ट्रातही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. राज्यातल्या ईडीच्या कारवाईबाबतही ही भेट असू शकते असे भाजप नेते सांगत होते. तर ही भेट 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत असू शकते, असे अजित पवारांपासून सर्व महाविकास आघाडीचे नेते सांगत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? हा प्रश्न संपूर्ण देशाला पडला होता. महाष्ट्रातही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. राज्यातल्या ईडीच्या कारवाईबाबतही ही भेट असू शकते असे भाजप नेते सांगत होते. तर ही भेट 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत असू शकते, असे अजित पवारांपासून सर्व महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. मात्र या भेटीत काय झालं याचा सस्पेन्स आता संपला आहे. या भेटीत तीन मुद्द्यावर चर्चा झाली आहे. यात राज्यातली ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली. संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली त्याबाबत मोदींशी चर्चा केली असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे. मागच्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्रतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे. त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. राज्यपालांकडून अडवणूक होत असल्याचे पवारांनी मोदींच्या कानावर घातलं.