महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याच्या कार्यालयावर ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी

महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याच्या कार्यालयावर ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी

| Updated on: Aug 18, 2023 | 5:14 PM

VIDEO | ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाने जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा, माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या जळगाव-नाशिकमधील एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई

जळगाव, १८ ऑगस्ट २०२३ | जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि माजी खासदार ईश्वर लाल जैन यांच्या सहा कंपन्यांवर मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत खळबळ उडाली आहे. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून जळगाव आणि नाशिकच्या एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. गुरुवारी जळगावमध्ये एकाचवेळी दहा गाड्या दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या जळगाव-नाशिकमधील एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणची संपत्ती आणि कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. ईडीच्या 60 सदस्यीय पथकाकडून ही चौकशी सुरु आहे. दरम्यान, मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती.

Published on: Aug 18, 2023 05:05 PM