Nawab Malik यांना अॅडमिट करण्यावरुन ईडी-डॉक्टरांमध्ये वाद, सूत्रांची माहिती
नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यावरुन ईडी आणि डॉक्टरांमध्ये जुंपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे का? अशी विचारणा ईडीकडून करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयातील यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीनं मेडिकलसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. नवाब मलिक यांना किडनी विकाराचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. आज नवाब मलिकांना डिस्चार्ज मिळणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या आधी नवाब मलिकांची किडनी विकारासंदर्भात तपासणी झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यावरुन ईडी आणि डॉक्टरांमध्ये जुंपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे का? अशी विचारणा ईडीकडून करण्यात आली होती. तर, डॉक्टरांनी आजच दाखल करण्याची गरज असल्याचं म्हटलं.
Latest Videos