गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; बघा काय आहे महत्त्वाचं अपडेट?
VIDEO | संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये राहिलेल्या प्रकरणात ईडीची सर्वात मोठी कारवाई, वाधवन यांच्या मालकीची जमीन जप्त
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईडीने गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने आज आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांची तब्बल 31 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांची गोव्यात असणारी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. तसेच त्यांना ईडीकडून अटक देखील करण्यात आलेली. विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांना तब्बल तीन महिने जेलमध्ये राहावं लागलेलं. राऊत यांना जवळपास तीन महिने जामीन मिळाला नव्हता आणि अखेर 103 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मिळाला होता. त्यानंतर संजय राऊतांची जामीनावर सुटका झाली. याच प्रकरणात ही मोठी अपडेट समोर आल आहे.