Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढणार? ईडीकडून गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढणार? ईडीकडून गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

| Updated on: Nov 03, 2023 | 10:23 AM

जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून रवींद्र वायकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी याप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी करणार आहेत.

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ | ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढणार असल्याचे पाहायला मिळत आहे. रवींद्र वायकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी याप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी करणार आहेत. रवींद्र वायकर यांच्यासह सहा जणांविरोधात ईडीने नुकताच गुन्हा दाखल केला आहे. जोगेश्वरीतील सुप्रिमो क्लबच्या जागेता गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोपाखाली वायकर यांच्याविरोधाक आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात हा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीकडून तपास करण्यात येणार आहे.

Published on: Nov 03, 2023 10:21 AM