बुकी अनिल जयसिंघानी प्रकरणात महत्त्वाची अपडेट; ईडीने केला मोठा दावा, म्हणाले...

बुकी अनिल जयसिंघानी प्रकरणात महत्त्वाची अपडेट; ईडीने केला मोठा दावा, म्हणाले…

| Updated on: Apr 21, 2023 | 10:20 AM

VIDEO | बुकी अनिल जयसिंघानी प्रकरणात महत्त्वाची अपडेट, ईडीच्या तपासात मोठी माहिती झाली उघड, बघा व्हिडीओ

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जयसिंघानीशी संबंधित 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध मालमत्ता शोधल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश मालमत्ता हॉटेल, फ्लॅट, दुकाने, जमीन पार्सल आणि इतर स्थावर मालमत्तांच्या स्वरूपात आहेत. जयसिंघानी आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे सहकारी यांची अनेक बँक खातीही उघडकीस आली आहेत जिथे कोट्यवधींचा बेहिशेबी पैसा जमा करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. क्रिकेट सट्टेबाजीमध्ये गुंतलेल्या अव्वल बुकींपैकी एक, ठाण्यातील उल्हासनगरचा रहिवासी अनिल जयसिंघानी हा आयपीएल आणि इतर काही क्रिकेट स्पर्धांमध्ये हजारो कोटींची सट्टेबाजी करत होता. दरम्यान, आता ईडी जयसिंघानीच्या नेटवर्कचा भाग असलेल्या इतर बुकींचाही शोध घेत आहे.