Breaking | भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी एक तासापासून एकनाथ खडसेंची ED चौकशी सुरु

Breaking | भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी एक तासापासून एकनाथ खडसेंची ED चौकशी सुरु

| Updated on: Jul 08, 2021 | 12:34 PM

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 13 तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या, तर 12 जुलैपर्यंत त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे.

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 13 तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या, तर 12 जुलैपर्यंत त्यांची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. त्याचवेळी खडसेंनाही अटक होण्याची शकत्या वर्तवण्यात येऊ लागली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावलं.

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याअगोदरच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत तर्कवितर्क रंगले होते. परंतु सकाळी अकराच्या सुमारास ते अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले.