Special Report | शिवसेनेचे मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर!

Special Report | शिवसेनेचे मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर!

| Updated on: Aug 30, 2021 | 12:00 AM

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस (Anil Parab ED Notice) जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस (Anil Parab ED Notice) जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे. येत्या मंगळवारी परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे. (ED issued notice to minister Anil Parab)

अनिल परब यांना ईडीची नोटीस

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने मोठी कारवाई केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबद्दलची माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिलीय. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

Published on: Aug 30, 2021 12:00 AM