Satara | जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणी पुणे आणि सातारा जिल्हा बॅंकेला ईडीची नोटीस
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला (Satara District bank) ईडीची (ED) नोटीस आलेली आहे. जरंडेश्वर प्रकरणी ईडी अॅक्शन मोडवर आली आहे. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या चर्चित जरंडेश्वर (Jarandeshwar) कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवलेली आहे.

जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची चौकशी
सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वरला 96 कोटींचे कर्ज दिले असल्याच्या खुलाशाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा बँकेने कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? अशा पद्धतीने ईडी तपास करु शकते.
Latest Videos