ईडीची नोटीस, 3 पवार 'ते' 2 वर्ष अन् तोच 1 योगायोग; ईडीच्या नोटीवरून आरोप-प्रत्यारोप

ईडीची नोटीस, 3 पवार ‘ते’ 2 वर्ष अन् तोच 1 योगायोग; ईडीच्या नोटीवरून आरोप-प्रत्यारोप

| Updated on: Jan 25, 2024 | 11:51 AM

२०१९ च्या निवडणुकीच्या आधीचा योगायोग हा २०२४ च्या निवडणुकीला घडतोय की काय? अशी चर्चा सुरूये. चार वर्षात समीकरणं आणि परिस्थिती बदलली आहेत. २०१९ ला शरद पवार यांना ईडीची नोटीस गेल्याची चर्चा आहे. स्वतः शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते अन्...

मुंबई, २५ जानेवारी २०२४ : २०१९ ला निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार ईडीच्या कार्यालयावर गेले होते आणि एका नोटीसीनं राजकारण तापलं होतं. आता तीच परिस्थिती २०२४ मध्ये होताना दिसते. मात्र नोटीस रोहित पवार यांना आहे. तर त्यावेळचे अजित पवार आता सत्तेत आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या आधीचा योगायोग हा २०२४ च्या निवडणुकीला घडतोय की काय? अशी चर्चा सुरूये. चार वर्षात समीकरणं आणि परिस्थिती बदलली आहेत. मात्र रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि त्यावरून राष्ट्रवादीनं केलेलं शक्तिप्रदर्शन आणि सरकारकडून दिली जाणारी उत्तर सारखीचं आहे. दरम्यान, २०१९ ला शरद पवार यांना ईडीची नोटीस गेल्याची चर्चा आहे. स्वतः शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर झाले याचदरम्यान, नॉट रिचेबल झालेले अजित पवार माध्यमांसमोर आलेत. ईडीच्या सुडासमोर राजकारणाचा आरोप करत अजित पवार भावूक झालेत. मात्र आता रोहित पवार यांना ईडीची नोटीस आली आहे. तर अजित पवार सत्तेच्या बाकावर आहे. त्यामुळे अजित दादांची भूमिका बदलली आहे.

Published on: Jan 25, 2024 11:50 AM