ईडीच्या हाती लागलं मोठं घबाड; 24 कोटींचे दागिने, 1 कोटी 11 लाख रोख अन् 60 मालमत्तांची…
VIDEO | जळगावात ईडीची मोठी कारवाई, राजमल लखीचंद ज्वेलर्स ईडी धाड प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ईडीने या प्रकरणात 24 कोटी 7 लाखांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाखांची रक्कम जप्त केली
जळगाव, १९ ऑगस्ट २०२३ | जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी धाड प्रकरणी महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. ईडीने या प्रकरणात 24 कोटी 7 लाखांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाखांची रक्कम जप्त केली आहे. ईडीने मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि जळगावमध्ये टाकलेल्या धाडीत जैन यांच्या 50 कोटींच्या 60 मालमत्तांची कागदपत्रेसुद्धा ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीकडून या कारवाईत 1 कोटी 11 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 60 मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत, ज्यांची किंमत 50 कोटी इतकी आहे. याशिवाय जैन यांच्या नावे जळगाव आणि जामनेरमध्ये दोन बेनामी मालमत्ता सापडल्या आहेत. या कारवाईतून ईडीच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. त्यामुळे ईडी याप्रकरणी सविस्तर तपास करत आहे. विशेष म्हणजे ईडीच्या तब्बल 60 अधिकाऱ्यांकडून ही धाडसत्राची मोहिम राबवण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांची ही कारवाई सलग 40 तास सुरु होती. ईडी अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापा टाकला. या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली. ईडीने सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत.