रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? काका सत्तेत अन् पुतण्याच्या बारामती अॅग्रोवर ED ची अॅक्शन
एकीकडे काका अजित पवार सत्तेत असताना दुसरीकडे पुतणा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीची छापेमारी... शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली यामध्ये रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीने धाड टाकली.
पुणे, ५ जानेवारी २०२४ : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे अडचणीत आले आहे. एकीकडे काका अजित पवार सत्तेत असताना दुसरीकडे पुतणा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली यामध्ये रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीने धाड टाकली. आज सकाळीच ईडीच्या पथकाने एकूण ६ जागी धाडी टाकल्या असून ही छापेमारीची कारवाई ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण विभागाने बारामती अॅग्रो कंपनीला नोटीस दिली होती. 72 तासांत प्लँट बंद करण्याची सूचना या नोटिसमध्ये दिली होती. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत गेल्या सप्टेंबर महिन्यात ही माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी स्थगितीही मिळवली होती.