Breaking | मुंबईत अनेक ठिकाणी ईडीच्या धाडी, अंधेरीच्या असोसिएट हाऊसवर छापा

| Updated on: Dec 20, 2021 | 8:42 PM

दिल्ली ईडीचे सुमारे वीस अधिकारी आज पहाटे मुंबईत दाखल झाले. दिल्लीतून आलेल्या या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या टीम बनवल्या आणि मुंबईच्या अनेक भागात सकाळपासून धाडसत्र सुरू केले. आठ टीम बनवून या अधिकाऱ्यांनी आठ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत

मुंबई : सकाळपासून ईडीच्या आठ ठिकाणी धाडी पडल्या आहेत. युनियन बँकेत 153 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, त्याचप्रकरणाचा उलगडा करण्यासाठी ईडीने हे धाडसत्र सुरू केले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला आहे, त्यामुळे यात अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सीबीआयच्या दिल्ली युनिट ने गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर आता दिल्ली ईडीने आपला मनी लाँड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ कारवाई सुरू केली आहे. दिल्ली ईडीचे सुमारे वीस अधिकारी आज पहाटे मुंबईत दाखल झाले. दिल्लीतून आलेल्या या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या टीम बनवल्या आणि मुंबईच्या अनेक भागात सकाळपासून धाडसत्र सुरू केले. आठ टीम बनवून या अधिकाऱ्यांनी आठ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात अनेक बाबींचा उलगडा झाला असून काही महत्वाची माहितीही ईडीच्या हाती लागली आहे. या धाडसत्रात ईडीने काही गोष्टी जप्तही केल्या आहेत.