हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढत्याच; ईडीचे कोल्हापूरसह पुण्यातही छापे
आबासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणांमध्ये पुणे आणि कोल्हापुरामध्ये ईडी कडून छापेमारीला सुरुवात
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा आबासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणांमध्ये पुणे आणि कोल्हापुरामध्ये ईडी कडून छापेमारीला सुरुवात झालेली आहे. याआधी सुद्धा याच प्रकरणांमध्ये ईडी कडून छापेमारी केलेली होती. त्यावेळी आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना, मुश्रीफ यांचे घर आणि कार्यालय त्याचबरोबर पुण्यातील सुद्धा काही ठिकाणी ईडी कडून छापेमारी करण्यात आली होती. आज करण्यात आलेल्या छापेमारीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असून हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Published on: Mar 10, 2023 01:01 PM
Latest Videos